Showing posts with label Letters. Show all posts
Showing posts with label Letters. Show all posts

Monday, 3 February 2020

प्रिय गोविंद,


प्रिय गोविंद

लहानपणापासून आईकडून तुझ्या अनेक गोष्टी ऐकल्याअनेक वेळा देवळात तुझी मूर्ति बाघितली, TV वर बाघितलंपण तुझाआणि तुझ्या सखी द्रौपदीचा विचार केला की हमखास तुमचा हेवा वाटतोतिच्याशी मन मोकळ्या गप्पा मारायलाचेष्टामस्करी करायलावेळ प्रसंगी सल्ले द्यायलामदतीलाआधार द्यायला कायम तु होतासएकदा केलेली मैत्री तु आयुष्यमभर निभावलीसत्यात गैरसमज नव्हतेसंकोच नव्हताशंका नव्हत्याहोता फक्त एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम.

महाभाराताची ती गोष्ट बघताना असं वाटायचंतुझ्या सारखा एक तरी सखा आयुष्यात असायला हवातो आयुष्यभर सोबत करेलयोग्य अयोग्य मार्ग दाखवेलसल्ले देईलसमजून घेईलमाझं ऐकुन घेईल आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास असेल.

व्यक्तिरूपात अजून तु समोर आला नसलास तरी अप्रत्यक्षपणे तु माझ्या बरोबर असतोस हे माहिती आहे मलाकधी कुठे अडखळले तर सल्ला देतोसकधी कुठली अडचण आली तर मार्ग दाखवतोसतुझं अस्तित्व कायम जाणवतं मला आजुबाजूला पण समोर मात्र येत नाहीस.

आयुष्यात अनेक मित्र भेटलेमनासारखा जोडीदार भेटला पण त्या 'गोविंद’ ची जागा अजूनही रिकामीच आहेकधीतरीवाटतं तु माझ्या जवळपासच असशील आणि मलाच ओळखता येत नसेलकुणावर असा मोकळेपणानी विश्वास ठेवायला मला तरी कुठे जमतय..! आणि शिवाय मला जशी तुझ्या भेटीची ओढ लागली आहेतसं तु मला भेटायलामाझीपण तर पात्रता हवी..!!

तुझी वाट पाहणारी,
तुझी सखी..

Saturday, 30 November 2019

प्रिय calendar,


प्रिय calendar, 

परवा तुमची पानं चाळता-चाळता सहज मागच्या पानांवर नजर गेली आणि सगळ्या तारखा डोळ्यांसमोर फिरू लागल्याकाही तारखा सुखद होत्याकाहींनी खोल आठवणी जागृत केल्या आणि टचकन डोळ्यात पाणी आलंकाही तारखानकोश्या होत्याकाही होत्या प्रेमाच्याकाही पोटभर हसवणाऱ्या तर काही परक्या वाटणाऱ्याकाहींमधे मनं दुरावली तरकाहींनी आपलंस केलं.
काही तारखांवर मन रेंगाळत राहिलंआणि काही तारखा हव्याहव्याश्या वाटल्या
कितीतरी वेगवेगळ्या भावना दडल्या होत्या तुमच्या तारखांमधे

 बघता बघता अजून एक वर्ष संपेलअनुभवाची शिदोरी अजून बळकट करत मला शहाणपण शिकवेल.

आता तुमच्या पानांवरचे थोडेच दिवस राहिले आणि किती तरी ठरवलेल्या गोष्टी राहून गेल्यादर वर्षी 
काही तरी निसटतच हातातुन
आयुष्याची एक-एक वर्ष पालटून जातात आणि वर्षाच्या शेवटी मागे वळून बघताना
मनात एक वेगळीच हुरहूर राहतेमनात एक कुतूहल निर्माण होतंआता येणारं वर्ष तरी ठरवल्यासारखं जाईल ?
कधीतरी वाटतंसगळ्यांनाच वाटत असेल का अशी हुरहुर ? का आपणच खंत करत बसतो ?
पण एक मात्र खरं तुमच्या पहिल्या तारखेची 'मी’ आणि शेवटच्या तारखेची 'मी’ ह्यात नक्कीच फरक असतो
त्या दोन्ही तारखा बघुन माझ्या प्रगतिचा आलेख मला स्पष्ट दिसतो आणि बरं वाटतं, 'चला हे वर्ष खूप काही देऊन गेलं’ !

आता लवकरच तुमच्या नवीन वर्षाचं नवीन रूप येईलआयुष्याच्या वेगळ्या तारखा घेऊननवीन उत्साहनवीन उमेदआणि नवीन आशा घेऊनया वर्षी राहून गेलेल्या गोष्टी पूर्ण करायला नवीन तारखा मिळतील आणि खुणावत राहतीलमाझं ध्येयतुमच्या तारखा संपताना राहिलेल्या गोष्टी आयुष्याच्या तारखा संपायच्याआत जमायला हव्या... बास !!

तुझी मैत्रिण..

Friday, 18 October 2019

प्रिय landline फोन,


प्रिय landline फोन, 

कसा रे बघता बघता नाहीसा झालास आमच्यामधून ? सगळ्या घरातल्या लोकांचा जीव की प्राण होतास तू. तू वाजलास की सगळे कसे धावत यायचे. तु वाजयच्या वेळा पण ठरलेल्या आसायच्या. सकाळच्या गडबडीत वाजलास की हमखास बाबांचा कामाचे फोन, दुपारी दादाचे कॉलेजचे, जेवणं झाल्यावर निवांत वेळी आईच्या मैत्रिणी किंवा बाहिणीं. माझ्यासाठी मात्र तू कधीही वाजायचास.

तुझ्या माध्यमातुन झालेली संभाषणं आपली वाटायची. गप्पा कुणाच्याही असोत, ऐकत बसण्यात भारी मज्जा यायची. आमच्या आजीचा तर हा एक आवडीचा छंद होता. दुसऱ्यांच्या गप्पा ऐकायच्या आणि मग त्यावर स्वतः तासभर गप्पा मारायच्या. तिला ऐकु जाऊ नये म्हणुन दादा तुला तास न् तास कोपऱ्यात घेऊन बसायचा आणि आजीला काही ऐकु न येता बोलणं झालं की जग जिंकल्याचा आनंद व्हायचा त्याला.

तुझ्यामुळे अमेरिकेतली आत्या, परगावची मावशी, गावातली काकू आणि गल्लीतली मैत्रिण सगळ्याच कशा जवळ असल्यासारख्या वाटायच्या. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला तरी तशी जवळीक काही वाटत नाही.

कधी तरी तू बंद पडलास की इतकं चुकल्या सारखं वाटायचं माहितीए ? तुला दुरुस्त करुन देणारा माणुस येईपर्यंत सगळं कसं सामसुम असायचं. सारखं तुला कानाला लावून तू बरा झालास का हे बघत बसायचो आम्ही. तु ही मान पाडुन निपचित पडल्यासारखा भासायचास.
तुला आठवतय ? तुला छान वाटावं म्हणुन repairing करणारा माणुस तुझ्यावर एक पट्टी चिकटवायचा. ती पट्टी असली की कसला छान वास यायचा तुला उचलल्यावर.
त्या काळात काही श्रिमंत लोकांकडे cordless फोन असायचे. तुला घेऊन घरात कुठ्ठेही फिरता यायचं. मला त्या लोकांचा कसला हेवा वाटायचा ठाऊके ? 
एक वेळ येईल की 'फोन घेऊन जग फिरता येईल’ असं मला तेव्हा कुणी सांगितलं असतं तर मी नक्की त्याला वेड्यात काढलं असतं !

पण तुला ऐकुन गम्मत वाटेल, तुझी सवय अजूनही गेलेली नाही बरका ! लोकं अजून ही मोबाईल ला तुच समजतात. बोलणं झालं की म्हणतात, 'ठेऊ का ?’ कुठे काय ठेवणार असतात ते, कुणाला माहित !?😄

असो, तुझ्या अनेक गमतीशीर आठवणी आहेत. एकदा तुलाच फोन करुन सांगीन कधीतरी. 
Miss you

तुझी मैत्रिण..

Saturday, 12 October 2019

प्रिय Wi-Fi router,


प्रिय Wi-Fi router,

तुझ्याशी रोजचा जवळचा संबंध असला तरी आपली बोलायची वेळ तशी कमीच येते. खरं म्हणजे आपल्याला २४ तास Rangeच्या धाग्यानी जोडलेलं असतं, तरी तु तुझ्या कामात व्यस्त आणि मी माझ्या ! असं असताना, मी तुला ' कृतघ्न ‘ वाटते असं तु म्हणालास ?? ऐकुन जरा धक्काच बसला. मी तुला किंवा तु मला नावं ठेवायला आपलं संबंध आला तरी कुठे ?

एक वेळ कुणी कौतुक नाही केलं तरी चालतं पण कुणी काही negative बोललं की मात्र mood फार खराब होतो. तसं तु केलं आहेस. जाब विचारावा तर आता मुक गिळुन बसलाएस. सांग न काय चुकलं माझं ?

ओह !! आत्ता लक्षात आलं. कधी तरी रेंज weak असली की तुझ्यावर चीड चीड होते माझी म्हणुन तु रागवलाएस ? Right हेच कारण आहे तर. कळलं... ! कधी कधी नं चुकतंच माझं. अरे कामंच तशी असतात online. थोडा वेळ जरी तुझी रेंज गेली, की जीव कसा कासावीस होऊन जातो आणि मग उगाच तुझ्यावर राग निघतो, आणि त्या उलट रेंज उत्तम असली, पटापट sites load झाल्या, सटासट video buffer झाले की तेव्हा मात्र तुझं कौतुक करायचं राहुन जातं. तुला कधी Thanx दिल्याचे ही आठवत नाही मला. कृतघ्नपणाच आहे हा.. मान्य आहे मला. Sorry रे..!

तुला महितीए न, माझ्या दैनंदिन आयुष्यात तुला किती अनन्यसाधारण महत्व आहे ते. फोन वर unlimited data असला तरी घरात पाऊल टाकता क्षणी तुझंच अधिराज्य असतं. 
तुला मुद्दाम दुखवीन का मी कधी ?
Sorry नं ! परत नाही होणार असं. आता तरी सोड न राग !

 तुझीच जवळची मैत्रिण..


Sunday, 29 September 2019

प्रिय.... झाडांनो,


प्रिय.... झाडांनो,

मला अनेक गोष्टींची आवड आहे, पण एक गोष्ट मला कधीच विशेष जमली नाही ती म्हणजे 'बागकाम’.
जुन्या घरी बंगल्याबाहेर मोठी बाग होती. क्वचित कधी तरी बागेला पाणी घालायचं काम माझ्याकडे यायचं. तेवढाच काय तो तुमचा संबंध. 

नवीन घरी आल्यावर मात्र ही आवड नव्याने जोपासायची असं मनाशी पक्क ठरवलं. स्वतः Nursery मधे जाऊन तुमचे आवडलेले २/४ प्रकार आणले. तुम्हाला साजेश्या सुंदर कुंड्या आणल्या. 
एक मात्र खरं, फुलांनी बहरलेल्या तुमच्या अस्तित्वानी घराला खरं घरपण आलं. तुमचं रूप बघुन डोळ्याचं पारणं फिटायचं. तुमची फुलं मात्र थोडेच दिवस टिकायची आणि परत यायचं नाव ही काढायची नाहीत, तरी तुमचे सगळे लाड मी पुरवत होते. TV जवळ तुम्ही खुलून दिसता म्हणुन तिथे तुमचा ठिया. थोडा वेळ ऊन दाखवायला हवं म्हणून दुपारी तुमची रवानगी खिडकी जवळ. रोजचं पाणी घालणे, कधीतरी खत ! 
साग्रसंगीत असे तुमचे सगळे लाड केले, पण तुम्ही मात्र महीना दोन महिन्यात मान टाकायचात. माझा हा उस्ना उत्साह टिकायची लक्षणं अवघडच दिसत होती. तरी मी हार मानली नाही !!
तुमचे नवीन नवीन प्रकार आणून प्रयत्नशील राहिले. 

ह्या सगळ्यामधे एकदा गावाला जायचं ठरलं. रोज काळजी घेऊन सुद्धा तुम्ही मान टाकणारे, ८ दिवस तुमचं काय होणार म्हणुन तुम्हाला घराबाहेर ठेवायचं ठरलं. बाईंना तुम्हाला पाणी घालयची जवाबदारी दिली आणि आम्ही निश्चिंतपणे जाऊन आलो. 
आल्यावर तुमची परिस्थिति कशी असेल ह्याबद्दल शंका होती पण आश्चर्याचा धक्काच बसला. तुम्ही अधिक टवटवीत होऊन बहरला होतात. ऊन, खत सारखे कुठलेच लाड तुम्हाला नको होते. 
आता मात्र माझा उत्साह पूर्ण गळून गेला आणि तुमची रवानगी कायमसाठी घराबाहेर गेली.

ह्या अनुभवाला काही दिवस गेले आणि विचार केला, प्रेमानी तुमची खातीरदारी करत असून काही तरी होतं जे तुम्हाला खटकत होतं. मनापासून केलेलं काम आणि वर वर केलेलं काम ह्यातला तो फरक असावा बहुधा. 
Positive negative vibes म्हणतात त्या ह्याच का ?


Sorry :(

Monday, 23 September 2019

प्रिय पुस्तक,


प्रिय पुस्तक,

कधी कधी मला आश्चर्य वाटतं की आपली मैत्री व्हायला एवढा वेळ कसा लागला..!..? लहानपणी आई फार वेळा तुझं महत्व पटवून द्यायची. 'हेच आपले खरे मित्र असतात, वेळ प्रसंगी कुणी नसलं, तरी हे आपली साथ कधी सोडत नाहीत’ वगेरे .... कितीतरी वेळा स्वतः पुढाकार घेऊन माझ्या हातात तुला द्यायची, अनेक वेळा स्वतः वाचून दाखवायची पण मला त्या वयात काही केल्या तुझी गोडी लागली नाही.
नाही म्हणायला, आईचा एखाद दुसरा हट्ट मी पुरवला असावा, पण म्हणावी तेवढी मजा आल्याचं मला काही आठवत नाही.
पण एकदाचं आईला यश आलंच !

तुझ्याबद्दल प्रेम वाटायला कॉलेजचे दिवस उजाडले, ते वयंच प्रेमात पडायचं असतं म्हणुन असावं बहुधा. दिवस रात्र तुला जवळ घेऊन मी तुझ्यात बुडलेली असायचे. डोळे उघडले की तु समोर, इतपत ते वाढलं. आई ओरडायची, तरी तहान भूक हरपून मी मात्र तुझ्याच मागे. समोर TV चालू असो, हातात जेवणाचं ताट असो, आईचा रियाज चालू असो किंवा इतर कुठलेही खंडीभर आवाज असोत, कशानीही आपल्यात दुरावा आला नाही.

ते वय ही असंच असतं, मनात येईल ते करता येण्यासारखं...
हळु हळु व्याप वाढत गेले आणि तुझा सहवास कमी कमी होत गेला, पण तरी तुझ्याबद्दल तीच ओढ अजूनही वाटते. अजूनही वाटतं, तुला हातात घेतलेलं की संपेपर्यंत खाली ठेवुच नये.. पण तसं होत मात्र नाही. आपलं जमलेलं tunning मधेच तुटतं आणि मग अनेक दिवस जातात परत वेळ मिळायला.
खरं सांगु .. ! एकांत.., डोळ्यासमोर तु आणि हातात कॉफीचा मग ह्यासारखं दुसरं सुख नाही. कितीही e-books येवो, online material मिळोपण तुझी सर मात्र कशातच नाही.

तुझी अनेक रूपं पहिली, अनेक अनुभव घेतले, कायम आनंदच दिलास.... पण आता मात्र थोडी भिती वाटते. ह्या socialmedia च्या जगात तुझं अस्तित्व हळु हळु कमी होतए. जो आनंद तु आम्हाला दिलास तो पुढची पिढी गमावणार का काय ? तुझं महत्व पटवून द्यायला आम्ही कमी पडणार का काय ? जे आईला जमलं ते मला जमेल की नाही ?
आपण मिळवलेला आनंद आपल्या मुलांना नको का मिळायला ?
ह्यावर आता तुच काहीतरी मार्ग काढ रे बाबा !

चिंतेत असलेली तुझी मैत्रिण..

Saturday, 14 September 2019

प्रिय सा,


प्रिय सा,

3 वर्षाची होते जेव्हा आईने तुझी पहिल्यांदा ओळख करून दिली. अगदी तेव्हापासून आपली मैत्री. पण खरं सांगू ? वर्षानुवर्ष जशी मैत्री घट्ट होत चाललीए तसा तसा तू अजून अजून लांब आहेस असं वाटतं कधी कधी. तसा तू जाम हट्टी आहेस हं ! तुला प्रेमानी कुरवाळलं, तुझी आर्जवे केली , तुझ्यामध्ये सर्वस्व ओतलं, तरी तू ..तुझी इच्छा नसेल तर मुळीच येत नाहीस जवळ. कायम तुझ्यासमोर शरणागती हवीच!
पण त्या शरणागतीत आनंद आहे. कुणाला तरी शरण जावंच ! त्यांनी आपला भार हलका होतो म्हणे !

आयुष्यात अनेक लोक आली, गेली. रुसवे फुगवे, हेवे, दावे, मत्सर सगळं अनुभवलं, पण तू कधी सोडून गेला नाहीस. माझ्या आनंदात माझ्या दुःखात सदैव पाठीशी उभा राहिलास, ओळख झाल्यापासून ! एखादी वस्तू किवा व्यक्ती सतत जवळ असल्यावर जसा तिचा लळा लागतो तसा तुझा लळा लागलाय. तुझी माझी ओळख माझ्या जन्मापासून असली तरी तू आमच्या घरातला खूप जुना सदस्य आहेस. माझ्या आईचा, आजीचा खूप जवळचा स्नेही !! म्हणूनच आपली पण मैत्री झाली, सहज, आणि गट्टी जमली, ती आयुष्याभाराचीच !!

तू आलास की तुझे सहा जोडीदारही आले. त्या सगळ्या स्वरांमधे देखिल तू आहेसच. सगळ्या सप्तकात स्वैर संचार करणं म्हणजे जग फिरण्याचा आनंद आणि फिरुन आल्यावर सा वर परत येणं म्हणजे जणू माहेरी आल्याचा भाव. तोच आनंद, तिच शांतता, तेच समाधान, तिच तृप्ति.

सगळ्या सप्तकाचा तु राजा. सहा स्वरांना जन्म देणारा तू..तू आणि तुला जन्म देणारा तो, तुमच्यात खूप साम्य दिसतं मला.. परमेश्वराचा अंशच तू ! अगदी त्याच्यासारखा. तुझ्या जवळ येता आला तर परमेश्वराच्या जवळ गेल्याचा आनंद होतो. तुझ्या सहवासात सगळं विसरतं. तल्लीन होता येतं. अवर्णनीय आनंदाची अनुभूती होते.
रियाजात कधीतरी भेटतोस. समोर उभा असतोस विठ्ठलासारखा कमरेवर हात ठेवून, कधीतरी हुलकावणी देऊन पळून जातोस लबाड बालकृष्णासारखा ! 

तुझ्यामुळे खूप आनंद मिळाला कायम. अनेक लोकं जोडली गेली, अनेक गुरु भेटले, खूप मित्र, काही हितशत्रू, काही निंदक आणि काही न पटणारी लोकं सुद्धा. अनेकांचं प्रेम मिळालं, आशीर्वाद मिळाले. खूप आदर सन्मान मिळाला. खरं म्हणजे माझ्या आनंदासाठी मी तुला कायम धरून ठेवलं. मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. त्या बदल्यात कुणी माझं कौतुक करावं, मला आदर द्यावा असं नव्हतंच मुळी पण परिसाच्या स्पर्शानी आयुष्याचं सोनं व्हायचं रहात नाही !

तू खूप दिलंस, खूप शिकवलस. जमिनीला घट्ट धरून ठेवण्याचा आदर्श दिलास. अजूनही खूप देत राहशील आयुष्यभर. माझी साथ मात्र सोडू नकोस कध्धीच..
तुझी कृतज्ञता शब्दात व्यक्त करणं अवघड आहे.
असंच तुझं प्रेम कायम मिळत राहो.

तुझीच मैत्रीण ...

Sunday, 8 September 2019

प्रिय helmet,


प्रिय helmet,

मान्य आहे ! माझ्यावर रागवायचा पूर्ण हक्क आहे तुला पण माझी बाजु ऐकुन तरी घे एकदा..!

माहितीए मला, दुकानातून आणल्यापासून, तु एका कोपऱ्यात पडून आहेस. तसं करायचं नव्हतं मला खरं तर. आठवतए तुला ? तुला निवडताना शोधून शोधून आवडीचा रंग घेतला होता. डोक्यावरून जवळ जवळ मिरवतच आणलं तुला पण नंतर मात्र विशेष कुठे फिरायला नेता आलं नाही.

तुला कुठे न्यायचं तर अडचणी किती असतात ! सगळ्यात मुख्य कारण म्हणजे, केस set करुन बाहेर पडलं की ते खराब होतात. आता प्रत्येक वेळी तुला काढल्यावर केस का विंचरत बसु ? डिकीतली सगळी जागा तुच खातोस. डिकीत सामान ठेवायचं तर तुच ठिया मांडून बसून राहतोस ? तुला हातात घेऊन फिरायचं तर केवढा तुझा तो आकार ? ते ही करुन बाघितलं एक दोनदा, तर तुच हरवतोस कुठेतरी !

तु डोक्यावर असलास की गाडीवर गप्पा सुद्धा मारता येत नाहीत नीट. ' आॅ आॅ’ करण्यातच वाट संपून जाते. त्यात वाटेत फोन आला तर तुझी केवढी अडचण होते.. कल्पना तरी आहे का ?
आधी pollution साठी scarf बांधायचा आणि मग त्यावर तु बसणार ! कित्ती गुदमरतं माहितीए ??

तु डोक्यावर असलास की कुणी ओळखतही नाही. परवा एकदा बाबा रसत्यात दिसले म्हणुन उत्साहात हात केला, तर माझ्याकडे बघुन ओळख नस्ल्यासारखे निघून गेले. सांग बरं, आता कुणाला द्यायचा हा दोष..?

मान्य आहे तु माझी काळजी घेतोस, पण मी गाडी जोरात चालवतच नाही मुळी..! आणि जाऊन जाऊन मी जाणार कुठे ? कोपऱ्यावर दूध भाजी आणायला, फार तर पुढच्या चौकात मुलींना क्लासला सोडायला. त्यात तुझा लवा जमा कुठे सांभाळु ?

Hope you understand !! तरी सुद्धा आठवड्यातून एकदा फिरायला नेत जाईन तुला.. promise !
आता तरी गेला का राग ?


तुझीच मैत्रिण..