Saturday, 16 November 2019

Voice blog 19 आवाज बिघडण्याची कारणे भाग १


गाणाऱ्यांना आवाजाप्रति जागरूकता निर्माण होण एक महत्वाची गोष्ट आहे. त्या विषयाचा अभ्यास प्रत्येक गायकाने करावा, आणि आपल्या आवाजाचं आरोग्य उत्तम ठेवावं ह्या हेतुने लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

आवाज बिघडण्याच्या मागे असंख्य कारणं असू शकतात आणि त्यातली बरीचशी परस्परांशी संबंधित असतात. आवाजातला किरकोळ बदल कधीतरी किरकोळ असतो किंवा पुढे येणाऱ्या संकटाची नांदी देणारा असतो, म्हणुनच कुठल्याही आवाजाच्या समस्येकडे दुर्लक्ष होता कामा नये. 
बहुतेक बिघडलेले आवाज हे अति वापरामुळे बिघडलेले असतात. आवाज निर्मिती होते तेव्हा स्वर तंतु एकमेकांजवळ येतात. त्यांना विश्रांती देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना तातपूर्त एकमेकांपासुन लांब ठेवणे. मौनाने अनेक आवाजाच्या समस्या बऱ्या होतात. आवाज बिघडण्याचं अजून एक कारण म्हणजे आवाजाची चुकीची निर्मिती. जोपर्यंत ही निर्मितीतली चुक सुधारली जात नाही तोपर्यंत कुठल्याही औषधाने किंवा मौनाने आवाज सुधारत नाही.

आवाजाच्या निर्मिती चुकीची होत असेल तर सुरवातीला मनासारखा न लागणारा आवाज कलांतरानी बिघडतो. अशा बिघडलेल्या आवाजात, आवाजाशी निगडित अवयवांमधे कुठलेही शारीरिक बदल दिसत नाहीत तरीसुद्धा मनासारखं गाता येत नाही. शारीरिक बदल दिसत नसल्यामुळे वैद्य, डॉकटर, ENT specialists सारखे कुणीही, आवाज पुर्वपदावर आणु शकत नाहीत. जवळ जवळ प्रत्येक गायकाला अशा आवाजाचा त्रास उद्भवतो. कधी कधी हे आवाजातले बदल तात्पुरते असतात, आणि कधीतरी गायक आयुष्यभर बदलेल्या आवाजाशी जुळवून घेताना दिसतात. गायकी शिकत असताना, तत्वांचं चुकीचं केलेलं अवलोकन ह्यामागचं मुख्य कारण आसावं. चुकीचा काढलेला आवाज, चुकिची पट्टी, अति जोर देऊन गाणे वगेरे सारख्या चुकीच्या अवलोकनामुळे आवाजावर परिणाम होतो. म्हणुनच गायकीचे संस्कार जेवढे कमी, तेवढा आवाज निकोप असं दिसून येतं. ह्याच कारणामुळे बऱ्याच वेळा आपण हा अनुभव घेतो कि मुख्य गायकापेक्षा तानपुऱ्यावर गाणाऱ्या शिष्याचा आवाज अधिक भाव खाऊन जातो. 
गायकी शिकत असताना आवाजाच्या बाबतीत कायम सतर्क राहुन गाणं शिकणं हा आवाज टिकवून ठेवण्याचा एक मार्ग आहे.

आवाज बिघडण्यामागची काही महत्वाची कारणं आपण बघुयात. ह्या काराणांमुळे आवाजात दोष निर्माण होतो. लगेच आवाज बिघडत नसला तरी चुकीच्या पुनरावृत्तिमुळे आवाज बिघडायला लागतो, मनासारखा लागेनासा होतो आणि त्याचे परिणाम शारीरिक पातळी वर दिसायला लागतात. स्वर तंतुंवर सूज येणं किंवा nodule तयार होणं, स्वर पट्टया पुरेशा बंद न होणं सारखे शारीरिक बदल दिसायला लागतात. असे झाल्यास surgery करुन किंवा औषधोपचार करुन आवाज सुधारण्याचा प्रयत्न केला जातो पण ह्या सर्व प्रक्रियेत मुळ आवाज गमावतो.

असे होऊ नये म्हणुन आवाजातले किरकोळ बदल अभ्यासुन वेळीच दूर करायला पहिजेत. आवाज निर्मितीत दोष येत नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. आवाज बिघडायला अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. त्यातली मुख्य लक्षण आपण पुढील लेखांमधुन बघु.

आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

No comments:

Post a Comment