प्रिय helmet,
मान्य आहे ! माझ्यावर रागवायचा पूर्ण हक्क आहे तुला पण माझी बाजु ऐकुन तरी घे एकदा..!
माहितीए मला, दुकानातून आणल्यापासून, तु एका कोपऱ्यात पडून आहेस. तसं करायचं नव्हतं मला खरं तर. आठवतए तुला ? तुला निवडताना शोधून शोधून आवडीचा रंग घेतला होता. डोक्यावरून जवळ जवळ मिरवतच आणलं तुला पण नंतर मात्र विशेष कुठे फिरायला नेता आलं नाही.
तुला कुठे न्यायचं तर अडचणी किती असतात ! सगळ्यात मुख्य कारण म्हणजे, केस set करुन बाहेर पडलं की ते खराब होतात. आता प्रत्येक वेळी तुला काढल्यावर केस का विंचरत बसु ? डिकीतली सगळी जागा तुच खातोस. डिकीत सामान ठेवायचं तर तुच ठिया मांडून बसून राहतोस ? तुला हातात घेऊन फिरायचं तर केवढा तुझा तो आकार ? ते ही करुन बाघितलं एक दोनदा, तर तुच हरवतोस कुठेतरी !
तु डोक्यावर असलास की गाडीवर गप्पा सुद्धा मारता येत नाहीत नीट. ' आॅ आॅ’ करण्यातच वाट संपून जाते. त्यात वाटेत फोन आला तर तुझी केवढी अडचण होते.. कल्पना तरी आहे का ?
आधी pollution साठी scarf बांधायचा आणि मग त्यावर तु बसणार ! कित्ती गुदमरतं माहितीए ??
तु डोक्यावर असलास की कुणी ओळखतही नाही. परवा एकदा बाबा रसत्यात दिसले म्हणुन उत्साहात हात केला, तर माझ्याकडे बघुन ओळख नस्ल्यासारखे निघून गेले. सांग बरं, आता कुणाला द्यायचा हा दोष..?
मान्य आहे तु माझी काळजी घेतोस, पण मी गाडी जोरात चालवतच नाही मुळी..! आणि जाऊन जाऊन मी जाणार कुठे ? कोपऱ्यावर दूध भाजी आणायला, फार तर पुढच्या चौकात मुलींना क्लासला सोडायला. त्यात तुझा लवा जमा कुठे सांभाळु ?
Hope you understand !! तरी सुद्धा आठवड्यातून एकदा फिरायला नेत जाईन तुला.. promise !
आता तरी गेला का राग ?
तुझीच मैत्रिण..
True fact
ReplyDelete