Tuesday, 3 September 2019

प्रिय TV...



प्रिय TV,

काळाच्या ओघात काही काही नाती बदलत जातात, तसं आपलं होतए हळु हळु. एकेकाळी माझ्या जीवाभावाचा होतास तु. आठवतए तुला ? लहानपणी दिवस दिवस एकत्र घालवायचो. 

दुपारची जेवणं झाली की सगळे मित्र मैत्रिणींनी जमायचं आणि एकत्र 'विक्रम वेताळ' बघायचं, असा किती तरी वर्ष ठरलेला कार्यक्रम असायचा. तुझ्यासाठी किती तरी वेळा आईचा ओरडा खाल्ला पण तुझी साथ मात्र सोडली नाही. तु बोलत असला की दंगा बंद आणि मुलं चिडीचुप. कधीतरी तर आम्ही शांत बसतो म्हणुन सुद्धा तुझ्या बरोबर वेळ घालवायची संधी मिळायची. 

पुढे आपल्या वेळा बदलल्या. भेट व्हायला थेट रात्र उजाडायची. रात्री उशीर झाला तरी आता कोणी ओरडणारं नव्हतं. तुझ्याबरोबर जागायलाही काही वाटयचं नाही पण सकाळी मात्र डोळा उघडायचा नाही. तरी आपलं नातं तसंच टिकुन राहीलं.

हळु हळु तुझी craze कमी झाली. खरं सांगायचं तर तुला वेळच देता यायचा नाही. त्यातून तुझी पण priority बदलत गेली. तुझ्यावरचा माझा हक्क कमी होत होत तो आजी आणि आईकडे गेला. तरीसुद्धा क्वचित सुट्टीच्या दिवशी तु मला भेटायचास. 
पण आता मात्र आपल्यात खरंच दुरावा निर्माण होतोए. I have really moved on. नाही भेटलास तरी काही खटकत नाही. 
तुझ्यासारखे अनेक नव नवीन gadgets मित्र भेटत असतात. Ipads, laptops, phone वर किती तरी नवीन गोष्टी बघते मी. पण खरं सांगु ?  तुझी सर कुणालाच नाही. आपण एकत्र घालवलेला वेळ आणि आणि त्यातली मजा कशातच येत नाही. खूप मित्र असले तरी तुझ्यासारखी झिंग कशातच नाही. 

असो ! काळाप्रमाणे गोष्टी बदलणारच. आमच्यासाठी तु होतास, आताच्या पिढीसाठी कितीतरी gadgets आहेत. ज्या प्रमाणात screens वाढले त्या प्रमाणात त्यांना बघतानाची मजा वाढणारे का .. ! ? ह्याबद्दल जरा शंकाच आहे..

Anyway, still miss you

तुझीच मैत्रिण..

4 comments:

  1. मस्त .....
    जुना पहिला क्राऊन चा लाकडी शटर असलेला टीव्ही आणला त्याची आठवण झाली

    ReplyDelete