Todays youth is gifted with an art of detachment..
कुठेतरी हे वाक्य वाचलं आणि खूप पटलं. नवीन पिढीचं कशाला आताच्या काळातले आपण सगळेच लोकं खूप अलिप्त असतो असं वाटतं, अर्थात भावनाहीन मात्र नाही..! Detached but emotional.. Demotional असा एक नवीन शब्दच शब्द कोषात टाकायला हवा.
पूर्वी तरुण पिढिला आई वाडिलांची वाटणारी जवाबदारी, काळजी आता वाटते का ? मित्रमैत्रिणींबद्दल किंवा रक्ताच्या नातेवाईकांबद्दल तरी ओढ वाटते का ? ज्या मित्र मित्रमैत्रिणींवर एकेकाळी जीव ओवाळून टाकतो ती मैत्री तरी आयुष्यभर टिकते का ?
शाळेत आपल्या बाईंवर किती प्रेम वाटत असतं, पुढे त्याच बाईंच नाव तरी स्मरणात राहतं का ? कॉलेज मधले दिवस तर आयुष्यतले सर्वोत्तम दिवस असतात. जमेल तेवढा दंगा मस्ती मजा केलेली असते. पुढे ह्याच मित्र मैत्रीणींचा whatsapp ग्रुप जमतो, अगदी खूप नाही पण किरकोळ हजेरी लावत असतो आपणही. त्यांचं reunion ठरतं पण आपण नसतो त्यात ! कशाला उगाच नवीन नाती म्हणून आपण मात्र अलिप्त !!
नोकरी चालू होते. जमेल तेवढं उत्तम काम करतो आपण. एखादवेळी best performer of the year award ही पटकावतो पण वेध असतात प्रगतीचे. सतत पुढे पुढे जायचे. Better prospects हवे ,better package हवं त्यासाठी सतत शोध नवीन नोकरीचा. Better job मिळालाच तर लगेच colleagues ना tata bye bye...मस्त एक send off पार्टी, contact मधे राहण्याचे promises, भेटण्याचे बेत आणि मग सगळ्यावर पाणी ! कसे काय लोक पूर्वी २५-२५ वर्ष एके ठिकाणी चिकटुन असायचे देव जाणे!
आयुष्य ज्या घरात घालवलं ते घर इतकं आपलंस असतं. आपलं बालपण तिथे सरतं. अनेक चांगल्या आठवाणी त्याच्याशी निगडित असतात. घरातली एखादी आवडीची जागा, अाभ्यसाची खोली, आंगण, माळा, काय काय आठवणी घर करुन असतात त्या जागेशी. पण क्षणात आलिप्त होतो आपण सगळ्या आठवणींमधून आणि शोधातो एक नवीन ऐसपाईस घर, पुनः नव्यानी आठवणी गोळा करायला.. त्या ही अलिप्तपणेच !
एवढंच कशाला आता तर रोटी कपडा मकान बरोबर companion हा ही एक महत्वाचा घटक झालाए आयुष्यात.
"झोप झाली का?, जेवलीस का?, काय करतीएस ?", अशासारखे सतत प्रश्ण कुणीतरी विचारायला हवे. संपर्कात हवं आणि चौकशी करायला हवी काळजी करायला हवी, ही सध्याची आपली गरज.
मग तो काळजी करणारा कुणीही असो, आज किरकोळ कारणावरून खटका उडालाच तर उदया नवीन मित्र !!
परिस्थिति काहीही असो स्वतःला फार लावून घ्यायचं नाही. मजा करायची आनंद मिळवायचा पण सगळं अलिप्तपणे !!
हा आलिप्तपणा आला तरी कधी आणि कुठुन ? .. बहुतेक स्वतःवरच्या अतीव प्रेमामुळे असं होत असावं. खूप शिक्षण, खूप पैसा, खूप मोकळिक, खूप स्वातंत्र्य खूप लहान वयात मिळतं आजकाल. त्याचा दुष्परिणामही होणाराच की ! आणि त्यात वाईट तरी काय ? आपली संत मंडळी सुद्धा हेच सांगून गेली की...कर्म कर पण अलिप्तपणे !!
एकदम बरोबर ✔️
ReplyDeleteखरं आहे..
ReplyDelete:)
ReplyDelete