Basically a singer, loves to do anything that is creative. Studying 'Singer's Voice' and writing blogs on it for every aspiring singer of Indian Classical Music.
Tuesday, 12 March 2019
Thursday, 7 March 2019
आम्ही गाणाऱ्या मुली
गाणं हे कुणाचं career असू शकतं ह्यावर आताशी कुठे मान्यता मिळायला सुरवात झाली आहे, नाहीतर अगदी आत्ता आत्ता पर्यंत लोकं विचारत होते, "गाता ते ठीके पण बाकी काय करता.."? ह्यावर माझं मात्र ठरलेलं उत्तर असायाचं.. ' मला तेवढ़च येतं '.
खूप लहानपणापासुन गायला सुरवात केली आणि कधी गाणं माझं career होऊन गेलं कळलंच नाही. दुसरं काही करावं असं वाटलं ही नाही आणि दुसरं काही केलं, म्हणून काही जमलं असतं असं ही नाही.
माझ्यासारख्याच अनेक मुली संगीत career म्हणून निवडतात, लोकं कौतुक करतात, वेळेला प्रोत्साहन ही देतात पण ही कला जोपासणं तितकं ही सोपं नसतं प्रत्येक मुलीला.
गाणाऱ्या मुलींच्या career चा हा एक छोटासा आढावा !
लग्नाआधी सगळ्याच गोष्टींचं कौतुक होत असतं, तसं ह्या ताज्या होऊ घातलेल्या career चं ही होतं ! आमच्या मुलीला अनेक कार्यक्रम असतात, लोकांना तिचं गाणं आवडतं, कौतुक होतं, लहान वयात कमवायला ही लागली.. , सगळंच कसं कौतुकास्पद.!
आजुबाजूला चांगले काळजी घेणारे मित्र असतात, रात्री अपरात्री उशिर झाला तर घरी येऊन सोडणार, ज्यांचं घरच्यांना ही कौतुक असतं. क्वचित शेजारपाजारच्यांना, नातेवाइक लोकांना काहीतरी खटकतं पण घरचे त्यांना उत्तरं द्यायला खंबिर असतात.
आणि अशात ठरतं लग्न ! सुरळीत चाललेलं सगळं बदलतं आणि नव्यानी सगळा डाव मांडावा लागतो जो कधीतरी पुनः जमतो आणि कधीतरी साफ बुडतो.
सुनबाई गातात ह्याचं थोडे दिवस कौतुक होतं .
कार्यक्रम लांबून बघायला बरे वाटतात पण खरी पंचाइत होते गाणारी सुन घरात आली की !
रियाज म्हणजे काही नोकरी नाही, हवा तेव्हा सोयीने करता येतो असा लोकांचा गैरसमज असतो, पण नोकरीपेक्षाही चिकटिनी आणि नियमितपणे करता येतो त्यालाच रियाज म्हणायला हवं खरं तर. हा सगळा प्रकार घरच्यांना नवीन असतो आणि नवीन घरात त्याचं तंत्र जमावणं सुनेलाही अवघडंच ! घरच्यांना, कलाकार सांभाळण सोपं नसतं आणि नव्या घरात बस्तान बसवणं सुनेला सोपं नसतं !
कार्यक्रमाला जातानाची मानसिकता, कार्यक्रमाची पूर्व तयारी, डोक्यात आणि मनात कार्यक्रमापूर्वीच सुरु असलेलं गाणं, त्याचा चाललेला विचार, हे सगळं सासरच्या लोकांना कसं बरं समजावं ?
कार्यक्रमाआधी कसं जेवण जात नाही, उशिरा जेवून कशी acidity होते, जागरणामुळे काय काय त्रास होतात, कार्यक्रम झाल्यावरही वाढलेल्या anxiety मुळे कशी झोप लागत नाही, सकाळी डोळा का उघडत नाही ह्याबद्दल सुन तरी काय खुलासा देणार ?
रात्रीबेरात्री कार्यक्रमानंतर कुणीतरी परकं आपल्या सुनेला घरी सोडयला येतं हे न आवडणं ही सहजिकंच आहे पण ह्यावर तोडगा काय ? बरं नवऱ्यानी बरोबर जावं तर सुनेबरोबर त्याचं ही routine डिस्टर्ब. रोज मरे त्याला कोण रडे ?
एकदा थोडं glamour आलं, लोकं ओळखु लागले आणि सासरच्यांना सुनेचा अभिमान वाटू लागला तर आनंदच आहे, पण निवृत्त व्हायच्या वयात आपली ओळखंच सुनेमुळे होऊ लागली तर कुणाला आवडेल ? ५० वर्ष ज्या घरात आपण राहतोए ते घर ही आता अमुक अमुक गाणारीचं घर म्हणून लोक ओलखायला लागले, तर थोडा त्रास होणारच की !
नवीन सुनेनी सणांना घरी असावं ही माफक अपेक्षा सुनबाई कशी पूर्ण करणार ? कार्यक्रम तर दिवाळी-गणपतीत असणार मग ऐन सणात आपल्यामुळे घर सुनं आहे आणि तरी आपल्याशिवाय सगळे सण पार पडतात ह्याची खंत सून तरी कुठे व्यक्त करणार ?
अशा सारख्या असंख्य छोट्या मोठ्या अडचणी पार करत आणि adjustments करत कुठलीही गाणारी मुलगी आपलं career घडवत असते. कलाकारांचं glamour दिसतं पण त्यामागचे त्यांचे कष्ट लोकांसमोर येत नाहीत, आणि हे कष्ट सुकर होण्यासाठी माहेराबरोबर सासरचा खंबीर पाठिंबा असेल तर यशाकडे जाण्याचा मार्ग अधिक सुकर होतो आणि एक कलाकार पूर्णपणे खुलतो हे मात्र नक्की.
मुलाबाळांसाठी career मधे ब्रेक घेणं, सगळं सोडून कार्यक्रमासाठी परदेशी जाणं, आजीनी नातवंडाना आईसारखं सांभाळणं, अशा हजारो adjustments करत माझ्यासरख्या असंख्य मुली आज संगीत क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत आहेत ते केवळ घरच्यांच्या पाठींब्यामुळेच. त्या अनेकांचा आदर्श आहेत आणि समाजात मानाचं स्थान मिळवत आहेत. अशा सर्व स्त्री कलाकारांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या त्यांच्या घरच्यांना माझा मानाचा मुजरा !!
Wednesday, 27 February 2019
माझी माय मराठी
लहानपणापासून अनेक मित्र मैत्रिणी भेटले. कधी कुणाबरोबर क्षण दोन क्षण आनंदात घालवले तर कधी कुणी आयुष्यभराचे सोबती झाले. पण या सगळ्यांमधे कायमची नाळ जुळली ती एकीबरोबर. प्रवास सुरू झाला आमच्या शाळेतून. पहिली ते दहावी एकत्र शिक्षाघेतली आणि मैत्री वाढली तशी अनेक वेळा एकत्र शिक्षा भोगलीही !
एका बाकावर बसून कधी भांडलो, रडलो, चिडलो, प्रसंगी वेगळेहीझालो पण मैत्रित बाक मात्र कधीच आला नाही.
लहानपणापासून दोघींमधे
अतीव माया. आमची मैत्री बघून एकदाआईनी आम्हाला दोन frock शिवले. आम्हाला एकमेकींचे कपडेघालायची कोण हौस ! आमची मापं वेगळी होती तरी माया उसवून, कपडे बदलून आम्ही डबडा ऐसपैस खेळत असू, आणि मग ह्या अदलाबदली मुळे राज्य घ्यायचं हुक्लं की कोण आनंद होत असे !
अतीव माया. आमची मैत्री बघून एकदाआईनी आम्हाला दोन frock शिवले. आम्हाला एकमेकींचे कपडेघालायची कोण हौस ! आमची मापं वेगळी होती तरी माया उसवून, कपडे बदलून आम्ही डबडा ऐसपैस खेळत असू, आणि मग ह्या अदलाबदली मुळे राज्य घ्यायचं हुक्लं की कोण आनंद होत असे !
शाळेला सुट्टी लागली की ओढ्यावर पोहायला जायचा आमचा बेतठरलेला असायचा. आमचं पोहण्याचं वेड बघुन आमच्यातलंकुणीतरी अव्वल पोहणारा होणार अशी सगळ्यांना खात्री वाटायची, पण वय वाढतं तसं आपला ही ओढा वेगवेगळ्या विषयांकडे बदलत जातो आणि लहानपणाच्या अनेक आवडी नकळत विरून जातात.
शाळेला सुट्टी लागली की आमचा मुक्काम एकमेकींच्या घरीच असायचा. आमच्या घरी मुक्काम असला की दादा उगाच दादागिरी करत आम्हाला पानभर शुद्धलेखन लिहायला लावायचा. मनाविरूद्ध अभ्यासाला बसवलं म्हणून आम्ही ही त्याला त्रास द्यायची संधी शोधायचो आणि मग पानं घ्यायची वेळ झाली तरी आम्ही अभ्यासाचं ढोंग करत त्यालाच पाट पाणी करायलालावायचो. त्याचं उट्ट निघायचं पत्त्याच्या डावात !
आमचा उपाय सोपा होता. चिडी खेळून, डाव मोडू आम्ही निघुनजायचो, पण खरंच .. ! त्या सोप्यात रंगलेल्या अशा अनेकआठवणी मनात अजून घर करुन आहेत.
पुढे वय वाढत गेलं तसं आयुष्य बदलत गेलं, वाटा वेगळ्या झाल्या. एकमेकींची भेट घडायला आता वाट बघावी लागते. दोघींची लग्नझाली तशी शहरंही बदलली. अंतरं वाढली तसा गाठी भेटीही कमी झाल्या पण दोघींची अंतरमनं मात्र अजूनही तशीच जोडलेलीआहेत.. !
Tuesday, 19 February 2019
Voice blog 8 बिघडणारा आवाज
गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
प्रत्येक गायकाला सर्व साधारणत: आपल्या सांगीतिक कारकिर्दीत कधीतरी आवाजाचा त्रास उद्भवतो. तो त्रास कधी किरकोळ स्वरूपाचा असतो जो थोड्या काळात बरा होतो तर कधीतरी तो गंभीर स्वरूप घेतो जो बरा व्हायला काही वर्ष सुद्धा जातात.
प्रत्येक आवाजाचा त्रास आधी किरकोळच वाटतो आणि असतो ही. वेळेत लक्ष दिल्यास तो लगेच बरा होऊ शकतो, पण दुर्दैवानी आवाज बिघडत असताना लक्षात येत नाही. आला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण लक्ष गायकीकडे असतं आणि लक्षात आलं तरी काय करायचं ह्याचा अभ्यास नसतो.
आवाजातील बिघाड हा बहुधा आवाज चुकीचा वापरण्यातुन निर्माण होत असतो. क्वचित शारीरिक अस्वास्थ्यामुळेही आवाज बिघडु शकतात.
प्रत्येक बिघडलेला आवाज शारीरिक स्तरावर लगेच दिसतोच असे नाही. तो एकदा बिघडला की हा शारीरिक बिघाड आहे असं समजुन डॉक्टर, ENT specialists, Voice Therapists वगेरेंकडे धाव घेतली जाते. वैद्यकिय शास्त्रातला तज्ञ हा संगीताचा अभ्यासक नसतो आणि संगीतातला तज्ञ हा आवाजातला तज्ञ असतोच असं नाही. ह्या कारणामुळे आवाजाला नक्की काय होतए हे कुणीच नीट समजू शकत नाही आणि योग्य तो उपाय सापडत नाही. तिन्ही विषयांचा अभ्यास असणारे तज्ञही सापडत नाहीत.
अशी एखादी आवाजाची समस्या उत्पन्न झाल्यास कुणी काही काळ गाणं बंद ठेवतं, कुणी आपआपल्या परीने उपाय शोधत राहतं, कुणाची कालांतरानी ह्यातुन सुटका होते, कुणी आयुष्यभर आवाजाची ती समस्या किंवा मर्यादा सांभाळुन गाणं चालु ठेवतं, आणि कुणाचं गाणं कायमचं बंद होऊन संगीतिक कारकिर्द संपुष्टात येते.
आवाजातले निश्चित उपाय त्याच्या निर्मितितिल दोष सुधारुन काढून टाकल्या शिवाय सफल होत नाहीत. आवाज निर्मिती नैसर्गिक झाली की आवाज मुळ पदावर येण्यास मदत होते पण नैसर्गिक आवाज कसा असावा ह्याचा अभ्यास नसतो.
चांगला आवाज कसा असावा, चांगल्या आवाजाची लक्षणं, आवाज चांगला होण्यासाठी काय करावं वगेरे बद्दल अनेकांनी अभ्यास केलेला आहे पण आवाज बिघडु नये म्हणुन काय करावं किंवा आवाज बिघडतो आहे हे वेळीच कसे ओळखावे याबद्दल सर्वत्र अज्ञान दिसतं. त्याचा अभ्यास आवश्यक आहे. सर्व गायकांना ह्याबद्दल माहिती असायला हवी आणि पुढच्या पिढीला आवाजाबद्दल जागरुकता निर्माण करुन त्यांना तसे शिकवायला हवे.
उस्ताद अल्लादिया खान साहेबांचा आवाज एकदा अति वापरामुळे बिघडला. आवाज आज सुधारेल उद्या सुधारेल या आशेत तो सलग दोन वर्ष जागेवर आला नाही. ‘ देवा! माझा आवाज मला परत दे, नाहीतर मरण दे’ , अशी दर नमाजाच्या वेळी ते हृदय फोडुन प्रार्थना करत. शेवटी दोन वर्षांनी आवाज किंचित काम देऊ लागला.
‘त्या दोन वर्षात मनाच्या कसल्या अवस्थेत मी काळ कंठला, त्याचे वर्णन करता येत नाही. जीवंत असून जगात नाही अशी स्थिति झाली होती’ असे खाँ साहेब म्हणत. पण त्यांनी धीर सोडला नाही. बिघडलेल्या गळ्याला एक स्वतंत्र वळण द्यायच्या उद्योगाला ते लागले आणि बिघाडातून त्यांनी अजब बनाव निर्माण केला.
आपला ही आवाज उत्तम असावा, तो जास्त काळ टिकावा आणि तो बिघडत असल्यास वेळीच लक्षात यावं ह्यासाठी आवाजाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे त्यासाठी तो पूर्ण बिघडण्याची वाट पाहु नये..!
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in
Thursday, 14 February 2019
Wednesday, 13 February 2019
Monday, 11 February 2019
कुणी मित्र देता का मित्र ?
लग्न ठरलं की प्रत्येक जण आपापल्या परिनी नव्या जोडप्याला सल्ले देत असतो. मिळणाऱ्या सल्ल्यांमधला, एक सल्ला मला नेहमी आठवतो. ‘लग्नाला दहा बारा वर्ष झाली की दोघांमधे बोलण्यासारखं काsही उरत नसतं. काय गप्पा मारायच्या आहेत त्या पहिल्या दहा वर्षात मारून घ्या.’ प्रत्येकाला वाटतं, ”आमचं नाही बाबा होणार तसं ! आमची क्षेत्र वेगळी, अनुभव वेगळे, आम्हाला एकत्र मिळणारा वेळ ही कमीच, मग बोलायला काही नसेल असं कसं ?”
पहिली दहा वर्ष छान जातात, ती जाणार असतातच. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना सगळं सांगणं, भरपूर गप्पा, sharing सल्ले मसलत.... आणि ..आणि मग अचानक सुरु होतात फक्त मित्रांच्या / मैत्रिणींच्या trips आणि ठरतात individual plans. मग जमतो वेगळा trekking चा ग्रूप, morningwalk चा group, Gym चा ग्रूप, शाळेतला ग्रूप, कॉलेज चा group आणि असे अनेक ग्रूप जिथे खूप जणं असतात फक्त नवरा आणि बायको सोडून ! आणि लक्षात येतं, इथेच खूप मज्जा येतीए. दोघांमधलं प्रेम तसुभरही कमी झालेलं नसतं पण आता जरा स्पेस हवी असते. नवीन कुणी तरी हवं असतं चौकशी करणारं, विचारपूस करणारं, दोन घटका गप्पा मारणारं, सल्ले देणारं.
ऑफिस मधल्या कामाच्या व्यापामधुनसुद्धा दिवसातून सहज म्हणून केलेला एखादा फोन कधी थांबतो कळतंच नाही. आता सहज फोन आला तर वाटतं ठीके न सगळं, किंवा मग, आज काहीच काम दिसत नाही म्हणून आठवण झालेली दिसतीए !
Birthdays, Anniversarys चे surprise गिफ्ट कधीच थांबलेले असतात. खूप आहे काय देणार म्हणून, किंवा ‘online पाहिजे ते सारखंच तर आणत असतेस अजून काय वेगळं आणायचं मी ?’, ‘तु सांग, हवं ते घ्यायला जाऊ ! ‘ पण ह्यात, गिफ्ट मिळायची मजा नाहीच मुळी.! अशा दिवशी कुठे दोघंच बाहेर जेवायला जावं म्हणलं, तरी काय बोलायचं बरं एकमेकांशी ? नवीन जोडपी कशी अखंड गुलू गुलू करत असतात, तसं कसं बरं जमावं आता ? हां, त्याजागी एखादा मित्र असेल तर मात्र जमेल. कसं कुणास ठाऊक बुआ !!
जरा विचार केला आणि वाटलं असं होणं स्वाभाविकच आहे की, अति परिचय आणि अति सहवासातून दुसरं काय होणार ? माणसाला ना सतत नाविन्याचा ध्यास असतो. आपल्याला फक्तं त्याच गोष्टीबद्दल कुतूहल आणि आकर्षण वाटत असतं, ज्या बद्दल माहीत नसतं आणि नवरा तर दहा वर्षांमधे कोळून प्यायलेला असतो. मग अशा वेळी मित्रंच तर कामी येणार ना ? गप्पा मारायची जागा एखाद्या मित्रानी घेतली तर काय बिघडलं ? उगाच कंटाळून, मारून मुटकुन, आणि पर्याय नाही म्हणून एकमेकांना सगळं सांगायला हवं असं कुणी सांगितलं ? मन मोकळं होणं महत्वाचं, मग ते नवऱ्याकडे असेल किंवा मित्राकडे, नवरा बायको मधे प्रेम टिकुन राहिलं म्हणजे बास !
त्या मैत्रीमधे आणि मैत्री पलिकडच्या नात्यामधे एक बारीकशी रेश असते, त्याचं भान असलं म्हणजे झालं !! ते भान ठेवुन मैत्री जमली तर खुशाल करावी मैत्री आणि खुशाल करावं मन मोकळं, उगाच नवऱ्यावर तरी कीती जवाबदाऱ्या टाकाव्या ?
Tuesday, 22 January 2019
Sunday, 20 January 2019
Voice Blog 7 आवाजाबद्दलच्या गैरसमजुती आणि अर्ध सत्य
गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मार्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.
अनेक गायकांचे आवाजाबद्दल अनेक गैरसमज असतात. ते कुणाशी बोलले जात नाहीत, विचारले जात नाहीत, त्या बद्दल चर्चा होत नाही आणि त्या बद्दल सांगणारं ही कुणी भेटत नाही. अशा काही गैरसमजुती आणि त्याचं निवारण ह्याबद्दलचा हा लेख.
१. माझा आवाज चांगला नाही.
मुळात प्रत्येकालाच जन्मत: निर्दोष आणि निकोप आवाज मिळालेला असतो. चुकीच्या सवयींमुळे, चुकीच्या संस्कारांमुळे किंवा चुकीच्या वापरामुळे आवाज आपलं नैसर्गिक स्वरूप घालवुन बसतात किंवा बिघडतात.
२. सुगम संगीताला आवाज गोड असावा लागतो मात्र शास्त्रीय संगीताला कसा ही आवाज चालतो.
कुठल्याही गान प्रकारात आवाज गोडच असावा. काय गाणार हा मुद्दा दुय्यम आहे, मुळात माध्यम उत्तम असावं.
३. माझ्या आवाजाला कधीही काहीही होणार नाही.
कुठलाही आवाज, कुठल्याही कारणामुळे बिघडु शकतो. त्याकडे जागरूकता असल्यास आवाजाचे त्रास वेळीच लक्षात येतील आणि आवाज बिघडण्याचा कालावधी कमी करता येईल.
४. खर्ज साधाना केली की आवाज बिघडत नाही आणि बिघडलेला आवाज सुधारतो.
खर्ज साधनेमुळे नैसर्गिक आवाज सुधारतो पण ती केल्यास आवाजाला काही होणार नाही असे नाही. खर्ज साधनेत आवाज कसा वापरतो ह्यावर आवाजाचं बिघडणं किंवा न बिघडणं अवलंबुन आहे.
५. खर्ज साधनेमुळे जेवढा आवाज खाली जातो तेवढाच वर जातो.
खर्ज साधना करत असताना तोंड, तोंडातला भाग, स्वर पट्टया, चेहरा आणि आवाज उत्पत्तिसाठी लागणारे सर्व स्नायु नैसर्गिक स्थितित असतात. त्या स्थितिची सवय करुन, तिच स्थिति ठेवुन गायल्यास, वरच्या पट्टीत ही सहज गाता येते आणि त्या सहजावस्थेत range वाढवण्याचा प्रयत्न केल्यास आवाज नैसर्गिक येतो.
६. गुरुचं अनुकरण केल्यास आवाज बिघडणार नाही.
आवाज बिघडण्याचं एक मुख्य कारण गुरुच्या आवाजाचं अनुकरण हे आहे. दोन आसमान गोष्टी समान करण्याच्या प्रयत्नात आवाज बिघडतो. अनुकरण शैलीचं, राग मांडणीचं किंवा घराण्यातल्या तत्वांचं करणं अपेक्षित असतं पण संगीत ही गुरुमुखी विद्या असल्याने मुख्यतः आवाजाचं अनुकरण केलं जातं. त्याबद्दल गुरु आणि शिष्य दोघांनी दक्ष असायला हवं.
७. आवाज हा तोंड, स्वरयंत्र, घसा, नाक, कान, vocal cords शी म्हणजेच केवळ अावाजाशी निगडीत अवयवांशी संबंधित आहे.
आवाज निर्मितीसाठी जवळ जवळ ३०० स्नायु कार्यरत असतात. ते सर्व नैसर्गिकरित्या कार्यरत होण आवाज निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. त्या व्यतिरिक्त functional problems मुळेही आवाजात दोष उत्पन्न होऊ शकतो. जास्त जोर लावुन गाणं, गाताना जीभ वर येणं, rangeच्या बाहेर ओरडुन गाणं ह्यामुळे ही आवाजाला त्रास संभावतो जो लगेच शारीरिक पातळी वर दिसून येत नाही. ह्या चुकांच्या पुनरावृत्तिने आवाजासंबंधी शारीरिक दोष निर्माण होतात.
८. शारीरिक किंवा मानसिक दोषांचा आवाजाशी संबंध नसतो.
शारीरिक आणि मानसिक दोष सर्वप्रथम आवाजावर परिणाम करतात. शारीरिक स्वास्थ्य, उत्तम आवाजासाठी महत्वाचं आहे. व्यायाम मन प्रफुल्लित करतं आणि मन निरोगी असल्यास गाण्याची उर्मी जास्त असते.
भिती, आनंद, दुःख ह्या सारखे भाव सर्वप्रथम आवाजातून दिसून येतात, त्यामुळे मानसिक दोष, आवाज बिघडण्यासाठी कारणीभूत असतात. मानसिक त्रास उद्भवणार नाहीत असे शक्य नाही पण त्या त्रासांवरची आपली प्रतिक्रिया आपलं मानसिक स्वास्थ्य ठरवत असते. त्या प्रतिक्रियांवर ताबा मिळवता येणं मानसिक स्वास्थ्य निरोगी ठेवेते.
९. ENT specialist किंवा डॉक्टर आवाजातले कोणतेही दोष काढु शकतात.
वर सांगितल्याप्रमाणे functional problems शारीरिक पातळीवर दिसत नाहीत. आवाज फाटणे, खर येणे, सारखा आवाज बसणे, हवे तसे सूर न लावता येणे वगेरे सारखे त्रास, आवाजाच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवतात. हे दोष शारीरिक पातळीवर लगेच दिसत नाहीत. जे दोष शारीरिक नाहीत त्यावर डॉक्टर किंवा ENT specialist उपाय करू शकत नाहीत, पण ते वेळेत लक्षात आले तर आवाज बिघडण्याचा काळ नक्कीच कमी करता येतो. ENT specialist किंवा डॉक्टर केवळ शारीरिक पातळीवरचे दोष सुधारु शकतात.
१०. एकदा बिघडलेला आवाज सुधारत नाहीत.
आवाज कुठल्याश्या कारणामुळे त्याची नैसर्गिकता घालवुन बसतो. चुकीचा आवाज वापारायची सवय होते आणि कालांतरानी तोच आवाज योग्य वाटायला लागतो. असा आवाज नैसर्गिक नसल्यामुळे बिघडतो. ती नैसर्गिकता परत मिळवता आली तर कुठलाही बिघडलेला आवाज सुधारता येऊ शकतो.
११. रोजचा रियाज असेल तर आवाजाला काही होत नाही.
रोजचा व्यायाम असुनसुद्धा अनेक गोष्टींमुळे शारीरिक आजार उद्भवतात, तसेच रोजचा रियाज असून सुद्धा अनेक चुकिच्या गोष्टींमुळे आवाज बिघडु शकातात.
१२. रियाजाने आवाजातला कोणताही बिघाड दुरुस्त होतो.
सर्व सामान्यतः रियाज हा form चा केला जातो माध्यमाचा नाही. माध्यम चुकीचं वापरल्यास आवाज बिघडतो. रियाजातले सातत्य, आवाजातला दोष काढु शकत नाही.
१३. वयात अाल्यावर फक्त पुरुषांचे आवाज बदलतात.
वयात आल्यावर पुरूषांच्या आवाजात मोठ्या प्रमाणात बदल होतो म्हणून तो स्पष्ट जाणवतो. स्त्रियांच्या बाबतीत ही hormonal changes मुळे आवाजात तात्पुर्ता बदल होतो आणि आवाज पुर्वव्रत होतो. तो बदल किरकोळ आणि तात्पुर्ता असल्यामुळे जाणवत नाही एवढेच.
१४. प्रत्येक आवाजाचा दोष शारीरिक स्तरावर दिसतो.
आवाजाचा चुकिचा वापर आवाजात दोष निर्माण करतो, पण प्रत्येक दोष शारीरिक पातळी वर निर्माण व्हायला त्या चुकींची पुनरावृत्ति व्हावी लागते. त्या मधल्यावेळेत आवाजाचा त्रास जाणवतो पण शारीरिक पातळीवर दिसत नाही.
१५. फक्त पुरुषांचे आवाज बिघडतात, बायकांच्या आवाजाला काही होत नाही.
कुणाचेही आवाज बिघडु शकतात, स्त्री पुरुषांचा त्याच्याशी संबंध नाही. पुरूष मुळात जोरकस गातात आणि नैसर्गिक आवाजापेक्षा जोरात गायल्यास आवाजाला त्रास होतो. ह्या कारणामुळे पुरूष गायकांना आवाजाचे त्रास जास्त उद्भवण्याची शक्यता असू शकेल.
१६. शास्त्रीय संगीत हे जोरकस आवाजात गायला हवे.
गाणं ऐकणाऱ्यावर प्रथम परिणाम होतो तो आवाजाचा. Form कुठलाही असो माध्यम परिणामकारक असावं. तो परिणाम जोरकस गाऊन आणि परिणामी आवाजाला त्रास देऊन करायचा का गोड गाऊन हा प्रत्येकानी विचार करण्याचा मुद्दा आहे.
१७. ऊंच स्वरात गायले तरंच गाणे गोड लागते.
ऊंच स्वरात गाऊन आवाज जास्त पातळ, हल्का आणि गोड लागतो पण तोच परिणाम खालच्या आवाजाही साधता येऊ शकतो. खालच्या पट्टित गाणारे अनेक यशस्वी गायक इतिहासात होऊन गेलेले आहेत.
१८. सर्व प्रकारचे आवाजाचे बिघाड मौनाने बरे होतात.
आवाजाचा अति वापर झाल्याने आवाज बिघडतात आणि ते दोष मौनाने बरे होऊ शकतात पण आवाज चुकीचा वापरायची सवय झाल्यास मौनाचा उपयोग होत नाही.
१९. शास्त्रीय गायकांना आवाज साधनेची गरज नाही.
आवाज साधना ही माध्यमासाठी केली जाते. ती प्रत्येक गायकासाठी गरजेची आहे.
२०. शास्त्रीय संगीताचा आवाजाशी संबंध नाही.
शास्त्रीय संगीत हे राग मांडणी, राग विस्तार ह्यावर अवलंबून असलं तरी ते उत्तम रित्या ऐकणाऱ्यांपर्यंत पोचण्यासाठी, आणि ते जास्तीत जास्त परिणामकारक होण्यासाठी माध्यम तयार असणं गरजेचं आहे. आवाज नसलेले अनेक गायक यशस्वी असले तरी आवाज चांगला असता तर ते अधिक लोकांना आकृष्ट करु शकले असते हे लक्षात घ्यायला हवे.
२१. राग घोटले की आवाज तयार होतो.
गायकी आणि आवाज ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत, त्यात गफलत करु नये. राग मांडणीत आवाज कसा वापरला हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे.
२२. गायकीमुळे आवाज बिघडत नाहीत.
गायकी शिकत असताना, घराण्याच्या तत्वांचं चुकिचं अवलोकन केलं जातं आणि आवाज बिघडतात. अमुकच स्वरात गाणे, अमुकच पद्धतीनी आवाज काढणे, चुकीचे उच्चार करणे वगेरे सारख्या चुकिच्या गोष्टींचं अनुकरण केलं जातं आणि आवाज बिघडतो.
२३. आवाज सुरेल करता येत नाही तो जन्मजात असतो.
रियाजातल्या सातत्याने आवाज सुरेल करता येतो आणि तो नैसर्गिकरित्या वापरल्यास सुरेल राहतो.
२४. अभ्यास राग विद्येचा करावा सुर अपोआप येतात.
राग अभ्यासाबरोबर अपेक्षित सुरेलपणा मिळवण्यासाठी सुरांची मेहनत गरजेची आहे.
२५. गायक मंडळी आवाजाची काळजी घेतात.
सर्वसामान्यपणे आवाजाला गृहीत धरलं जातं. आवाजाच्या किरकोळ तकरारींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनचं गायक मंडळी आवाजाच्या बाबतीत असमाधानी दिसतात.
आवाजाची जात समजून त्याला योग्य ती काळजी घेणारे गायक, कमी दिसतात.
आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in
Friday, 18 January 2019
ध्येय
संध्याकाळी ७ ची meeting ठरली होती. घड्याळ नेहमीप्रमाणे सुसाट धावत होतं... ६:१५ . मनात चक्र सुरु झाली. घरातुन निघुन पोचायला ७ होतील. त्यात traffic. खणलेले रस्ते, पाऊस..ताबडतोब निघायला हवं.
घरातली मुलींची सोय बघुन, त्यांची पोटं भरून निघायची तयारी केली. कितीही वेळेत आवरलं तरी ऐनवेळी मुलींचं काहीतरी नवीन टुमणं निघतं आणि व्हायचा तो उशिर होतोच. धावत पळत हाॅटेल गाठलं. तिथे अजून कुणी पोचलं नव्हतं. एक table धरुन बसले.
अजुन डोक्यात घरची चक्र फिरत होती. घर आणि profession साठी असं on off चं बटण असतं तर बर झालं असतं. कामात असताना मुलींचा विचार बंद आणि घरात professional काम बंद ! असं झालं असतं तर घरात आणि profession वर १००% लक्ष केंद्रित झालं असतं आणि दोन्हीकडे जरा बरं काम करता आलं असतं. असो!
शेजारच्या टेबल वर एक बाई आणि तिची दोन मुलं बसली होती. ४ वर्षाचा मुलगा आणि ८ वर्षाची मुलगी. डोक्यतला विषय समोर live घडत होता. साहजिकच माझं लक्ष तिकडे गेलं.
" काय घेणार तू रोहित ? मस्त कुरकुरीत डोसा मागावु का ? का छान गोल गोल इडली खातोस ? " , ' मला नाई भूक तूच खा ',
" अरे असं रे काय करतोस , केवढी भूक लागली होती मगाशी, आता काय झालं " , वगेरे वगेरे typical आई मुलांचं संभाषण चालू होतं.
त्या मुलाचं कारण नसताना रडणं आणि आई चा patience संपलेला असताना अतिशय शांतपणे सगळं शिताफीनी handle करणं.
मला उगाचच त्या मुलाचा राग येत होता. ह्या मुलांमुळे देव जाणे किती बयकांचं career संपुष्टात येत असेल. अनेक ध्येय धूसर होत असतील. Career बद्दलची बाघितलेली स्वप्न धुळीला मिळत असतील. मुलं वाढवण्यात आनंद निश्चित अाहे तरीसुद्धा आपल्या career ची त्यासाठी आहूती देऊन खरचं किती बायका मनापासुन समाधानी असतील ?
आणि बायकांनीच मुला बाळांसाठी career सोडायचा मक्ता घ्यायचा का ? पुरूषांचं career तेवढं महत्वाचं ?
अनेक जणी मुलं सांभाळून career करत असतील पण ही तारेवरची कसरत करताना काय होतं हे त्यांचं त्यांनांच ठाऊक ! एवढं करुन समाज नावंच ठेवणार. हिला मुलांपेक्षा carrier महत्वाचं ! काय अडलय मुलांना पाळणा घरात ठेवुन नोकरी करायची ? ५ वर्ष नाही काही केलं तर नाही का चालणार वगेरे वगेरे !
मुलांकडे बघायला घरी कुणी नसेल तर हिला थांबायला हवं. नवरा दिवसभर बाहेर असेल तर हिला घरी थांबणं अपरिहार्यच अशा अनेक adjustments बायकांनीच करायला हव्यात. असो !!
ही बाई पण अशीच एक मुलांनां सांभाळणारी आई म्हणूनच एकटी आली असणार.
मला त्या अनोळखी बाई साठी उगाचच softcorner जागृत झाला.
तेवढ्यात आमची meeting सुरु झाली. अर्ध्या पाऊण तासात कामाचं बोलणं झालं, कॅाफी झाली आणि माझं लक्ष परत एकदा शेजारच्या टेबल कडे गेलं.
आधीचं दृश्य संपुर्णत: पालटलेलं होतं. मुलगा खूप maturity नी वागत स्वतःच्या हातानी पाव भाजी खात होता आणि ताई जवाबदारीनी त्याच्यकडे लक्ष देत, काय हवं नको ते बघत होती. टेबल वर फक्त दोघांनाच बघुन मी क्षणभर अस्वस्थ झाले आणि त्यांच्या आईला आजुबाजूला शोधु लागले. जवळच आई दिसली आणि मी अवाक झाले. ती बाई ४ टेबलं सोडुन laptop ऊघडून २ सहकार्यांबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करत होती. मी स्तब्ध झाले. तिच्याबद्दल अनेक विचार डोक्यात फिरू लागले.
प्रथम तिच्याबद्दल आदर वाटला, काम असताना, परिस्थिति प्रतिकूल असताना, कुठलीही सबब न सांगता ती कामासाठी हजर राहिली. मग तिचं कौतुक वाटलं, मुलांना इतक्या लहान वयात, इतकी समज देऊन, इतकं co-operate करायला शिकवल्याबद्दल, आणि मग तिचा हेवा वाटला. आजुबाजूच्या अनेक लोकांच्या करड्या नजरांचा तिच्यावर तसुभरही परिणाम होत नव्हता, कारण ती त्या सर्वांपेक्षा वर होती. तिच्या कामानी, तिच्या ध्येयानी आणि कर्तृत्वानी.
आमची meeting संपली आणि तेवढ्यात ती ही मोकळी झाली. जाता जाता तिला भेटले, एक घटका तिचा हात हातात घेतला आणि हसून बाहेर पडले. ओळख नसली तरी मला जाणवलेली प्रत्येक गोष्ट न बोलताच तिच्यापर्यंत पोचली होती, थोडी नजरेतुन आणि थोडी स्पर्शातून !!
घरातली मुलींची सोय बघुन, त्यांची पोटं भरून निघायची तयारी केली. कितीही वेळेत आवरलं तरी ऐनवेळी मुलींचं काहीतरी नवीन टुमणं निघतं आणि व्हायचा तो उशिर होतोच. धावत पळत हाॅटेल गाठलं. तिथे अजून कुणी पोचलं नव्हतं. एक table धरुन बसले.
अजुन डोक्यात घरची चक्र फिरत होती. घर आणि profession साठी असं on off चं बटण असतं तर बर झालं असतं. कामात असताना मुलींचा विचार बंद आणि घरात professional काम बंद ! असं झालं असतं तर घरात आणि profession वर १००% लक्ष केंद्रित झालं असतं आणि दोन्हीकडे जरा बरं काम करता आलं असतं. असो!
शेजारच्या टेबल वर एक बाई आणि तिची दोन मुलं बसली होती. ४ वर्षाचा मुलगा आणि ८ वर्षाची मुलगी. डोक्यतला विषय समोर live घडत होता. साहजिकच माझं लक्ष तिकडे गेलं.
" काय घेणार तू रोहित ? मस्त कुरकुरीत डोसा मागावु का ? का छान गोल गोल इडली खातोस ? " , ' मला नाई भूक तूच खा ',
" अरे असं रे काय करतोस , केवढी भूक लागली होती मगाशी, आता काय झालं " , वगेरे वगेरे typical आई मुलांचं संभाषण चालू होतं.
त्या मुलाचं कारण नसताना रडणं आणि आई चा patience संपलेला असताना अतिशय शांतपणे सगळं शिताफीनी handle करणं.
मला उगाचच त्या मुलाचा राग येत होता. ह्या मुलांमुळे देव जाणे किती बयकांचं career संपुष्टात येत असेल. अनेक ध्येय धूसर होत असतील. Career बद्दलची बाघितलेली स्वप्न धुळीला मिळत असतील. मुलं वाढवण्यात आनंद निश्चित अाहे तरीसुद्धा आपल्या career ची त्यासाठी आहूती देऊन खरचं किती बायका मनापासुन समाधानी असतील ?
आणि बायकांनीच मुला बाळांसाठी career सोडायचा मक्ता घ्यायचा का ? पुरूषांचं career तेवढं महत्वाचं ?
अनेक जणी मुलं सांभाळून career करत असतील पण ही तारेवरची कसरत करताना काय होतं हे त्यांचं त्यांनांच ठाऊक ! एवढं करुन समाज नावंच ठेवणार. हिला मुलांपेक्षा carrier महत्वाचं ! काय अडलय मुलांना पाळणा घरात ठेवुन नोकरी करायची ? ५ वर्ष नाही काही केलं तर नाही का चालणार वगेरे वगेरे !
मुलांकडे बघायला घरी कुणी नसेल तर हिला थांबायला हवं. नवरा दिवसभर बाहेर असेल तर हिला घरी थांबणं अपरिहार्यच अशा अनेक adjustments बायकांनीच करायला हव्यात. असो !!
ही बाई पण अशीच एक मुलांनां सांभाळणारी आई म्हणूनच एकटी आली असणार.
मला त्या अनोळखी बाई साठी उगाचच softcorner जागृत झाला.
तेवढ्यात आमची meeting सुरु झाली. अर्ध्या पाऊण तासात कामाचं बोलणं झालं, कॅाफी झाली आणि माझं लक्ष परत एकदा शेजारच्या टेबल कडे गेलं.
आधीचं दृश्य संपुर्णत: पालटलेलं होतं. मुलगा खूप maturity नी वागत स्वतःच्या हातानी पाव भाजी खात होता आणि ताई जवाबदारीनी त्याच्यकडे लक्ष देत, काय हवं नको ते बघत होती. टेबल वर फक्त दोघांनाच बघुन मी क्षणभर अस्वस्थ झाले आणि त्यांच्या आईला आजुबाजूला शोधु लागले. जवळच आई दिसली आणि मी अवाक झाले. ती बाई ४ टेबलं सोडुन laptop ऊघडून २ सहकार्यांबरोबर खांद्याला खांदा देऊन काम करत होती. मी स्तब्ध झाले. तिच्याबद्दल अनेक विचार डोक्यात फिरू लागले.
प्रथम तिच्याबद्दल आदर वाटला, काम असताना, परिस्थिति प्रतिकूल असताना, कुठलीही सबब न सांगता ती कामासाठी हजर राहिली. मग तिचं कौतुक वाटलं, मुलांना इतक्या लहान वयात, इतकी समज देऊन, इतकं co-operate करायला शिकवल्याबद्दल, आणि मग तिचा हेवा वाटला. आजुबाजूच्या अनेक लोकांच्या करड्या नजरांचा तिच्यावर तसुभरही परिणाम होत नव्हता, कारण ती त्या सर्वांपेक्षा वर होती. तिच्या कामानी, तिच्या ध्येयानी आणि कर्तृत्वानी.
आमची meeting संपली आणि तेवढ्यात ती ही मोकळी झाली. जाता जाता तिला भेटले, एक घटका तिचा हात हातात घेतला आणि हसून बाहेर पडले. ओळख नसली तरी मला जाणवलेली प्रत्येक गोष्ट न बोलताच तिच्यापर्यंत पोचली होती, थोडी नजरेतुन आणि थोडी स्पर्शातून !!
Subscribe to:
Posts (Atom)