Tuesday, 26 March 2019

Voice blog 9 आवाज आणि मानसिकता




गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

बहुतेक सर्व शारीरिक आजार हे psychosomatic असतात असं सिद्ध झालेलं आहे आणि आता हे सर्वमान्य आहे की बहुतेक आजार आपल्या मानसिकतेतुन निर्माण होत असतात.

उत्तम आवाजाच्या बाबतीत ही ह्या मानसिकतेचा मोठा वाटा असतो. आवाजाची निर्मिती अयोग्य होत असेल तर अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. त्यातलं एक कारण मानसिकता आहे. आपल्यापैकी प्रत्येकानीच हा अनुभव घेतला असेल की आनंदी असताना, मन उत्साही असताना गाण्याची उर्मी जास्त असते. ह्या मनस्थितित कलेचा आनंद स्वतः घेता येतो आणि साहजिकच दुसऱ्याला ही देता येतो. मनस्थिति या उलट असली तर कलाकाराला आपलं उत्तम देता येत नाही. थोडक्यात उत्तम गाण्यासाठी मनस्थिति उत्तम ठेवणे कलाकाराला अपरिहार्य आहे.

आपल्या मानसिकतेमुळे आवाजात ही बदल होत असतो. उदा ; भिती वाटत असल्यास गाताना आवाज कोरडा पडणं किंवा आवाजात कंप निर्माण होणं. मानसिक अवस्थेत समतोलता साधणं अत्यंत गरजेचं आहे, कारण बिघडलेली मानसिक स्थिति आवाज बिघडण्याचं कारण ठरु शकते. आपल्या आयुष्यात काहीच वाईट घडणार नाही असे नाही पण त्या समस्यांना आपण कसे सामोरे जातो ह्यावरुन आपली मानसिक स्थिति अवलंबून आहे हे मात्र नक्की. आपले त्रास, दुःख विसरुन संगीताकडे बघता यायला हवे. इतर कुठल्याही त्रासापेक्षा गाण्याची उर्मी जास्त असली तरच इतर गोष्टींचा अावाजावर कमी परिणाम होईल.

ध्रुपद गायकांमधे आणि शास्त्रीय गायकांमधे मानसिकतेचा खूप फरक दिसुन येतो. त्यांच्या गाण्यात अधिक पावित्र्य दिसुन येतं. फरक आहे तो समर्पणाचा. मी गाते आणि मी केवळ माध्यम आहे ह्यातल्या भावाचा तो फरक आहे. मी गाते म्हणल्यावर माझ्या गाण्याची जवाबदारी माझ्यावर येते पण मी माध्यम असल्यावर माझा भाव शरणागतीचा असतो जो भाव ध्रुपदियांमधे जास्त दिसून येतो. त्यांचा आवाज उत्तम राहण्याचं हे एक कारण असू शकेल.

मानसिकता बिघडण्याचं अजून एक कारण म्हणजे आपल्या प्रमाणाबाहेरच्या मैफिलींची संख्या. अनेक यशस्वी गायक आपल्या मैफिली प्रामाणात ठेवतात. त्या पेक्षा जास्त असल्यास स्वीकारत नाहीत, कारण जागरणं, अर्धवट झोप, प्रवास ह्या सगळ्या कारणांनी आवाज बसेल की काय ह्या कल्पनेनी तसे विचार चक्र सुरू होतात. शारीरिक व बाह्य परिस्थितितील बदलांमुळे आवाज बिघडेल अशी मानसिक भिती बाळगणं ह्यामुळेही आवाज बिघडु शकतो.
शिवाय competition, insecurity, glamour, comparison, status वेगेरे गोष्टींमुळेही मानसिक अवस्था बिघडायला वेळ लागत नाही.

हे सगळं टाळता येणं शक्य नाही पण त्याचा संबंध गाण्याशी जोडणं टाळायाला हवं आणि त्यासाठी गाणं ही परमेश्वरची साधना आहे असा भाव असल्यास समतोल मानसिकता साधता येईल. गाणं हा अानंदाचा मार्ग आहे, त्यात शरणागतीचा भाव आहे, अशी भूमिका असल्यास मन शांत राहील आणि आवाज बिघडण्याचं एक कारण संपुष्टात येईल.


आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

4 comments:

  1. Very well written. Music (singing) is one such art form which gives us the capacity to pass on our emotion to the audience and keeping ourselves composed can be the most appropriate way to give justice to it. This aspect is seldom thought of.
    Thanks for sharing!

    ReplyDelete
  2. फारच उत्तम आणी महत्वपूर्ण माहिती. धन्यवाद.

    ReplyDelete