Wednesday, 27 February 2019

माझी माय मराठी




लहानपणापासून अनेक मित्र मैत्रिणी भेटले. कधी कुणाबरोबर क्षण दोन क्षण आनंदात घालवले तर कधी कुणी आयुष्यभराचे सोबती झाले. पण या सगळ्यांमधे कायमची नाळ जुळली ती एकीबरोबर. प्रवास सुरू झाला आमच्या शाळेतून. पहिली ते दहावी एकत्र शिक्षाघेतली आणि मैत्री वाढली तशी अनेक वेळा एकत्र शिक्षा भोगलीही !

एका बाकावर बसून कधी भांडलोरडलोचिडलोप्रसंगी वेगळेहीझालो पण मैत्रित बाक मात्र कधीच आला नाही.

लहानपणापासून दोघींमधे
अतीव मायाआमची मैत्री बघून एकदाआईनी आम्हाला दोन frock शिवलेआम्हाला एकमेकींचे कपडेघालायची कोण हौस ! आमची मापं वेगळी होती तरी माया उसवूनकपडे बदलून आम्ही डबडा ऐसपैस खेळत असूआणि मग ह्या अदलाबदली मुळे राज्य घ्यायचं हुक्लं की कोण आनंद होत असे !

शाळेला सुट्टी लागली की ओढ्यावर पोहायला जायचा आमचा बेतठरलेला असायचाआमचं पोहण्याचं वेड बघुन आमच्यातलंकुणीतरी अव्वल पोहणारा होणार अशी सगळ्यांना खात्री वाटायचीपण वय वाढतं तसं आपला ही ओढा वेगवेगळ्या विषयांकडे बदलत जातो आणि लहानपणाच्या अनेक आवडी नकळत विरून जातात.

शाळेला सुट्टी लागली की आमचा मुक्काम एकमेकींच्या घरीच असायचा. आमच्या घरी मुक्काम असला की दादा उगाच दादागिरी करत आम्हाला पानभर शुद्धलेखन लिहायला लावायचामनाविरूद्ध अभ्यासाला बसवलं म्हणून आम्ही ही त्याला त्रास द्यायची संधी शोधायचो आणि मग पानं घ्यायची वेळ झाली तरी आम्ही अभ्यासाचं ढोंग करत त्यालाच पाट पाणी करायलालावायचोत्याचं उट्ट निघायचं पत्त्याच्या डावात !
आमचा उपाय सोपा होता. चिडी खेळूनडाव मोडू आम्ही निघुनजायचोपण खरंच .. ! त्या सोप्यात रंगलेल्या अशा अनेकआठवणी मनात अजून घर करुन आहेत.

पुढे वय वाढत गेलं तसं आयुष्य बदलत गेलं, वाटा वेगळ्या झाल्याएकमेकींची भेट घडायला आता वाट बघावी लागतेदोघींची लग्नझाली तशी शहरंही बदललीअंतरं वाढली तसा गाठी भेटीही कमी झाल्या पण दोघींची अंतरमनं मात्र अजूनही तशीच जोडलेलीआहेत.. !

Tuesday, 19 February 2019

Voice blog 8 बिघडणारा आवाज




गाणाऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाची आणि तरीसुद्धा दुर्लक्षित गोष्ट म्हणजे आवाज. त्या आवाजाला थोडं महत्व प्राप्त करुन देण्याचा हा एक छोटसा प्रयत्न. गाणाऱ्यांची स्वतःच्या आवाजाबद्दल जागरुकता आणि त्याचा अभ्यास हा हेतु ठेवुन, डॉक्टर विद्याधर पंडित ह्यांच्या मर्गदर्शनाखाली लिहीलेले हे blog गायकांना उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

प्रत्येक गायकाला सर्व साधारणत: आपल्या सांगीतिक कारकिर्दीत कधीतरी आवाजाचा त्रास उद्भवतो. तो त्रास कधी किरकोळ स्वरूपाचा असतो जो थोड्या काळात बरा होतो तर कधीतरी तो गंभीर स्वरूप घेतो जो बरा व्हायला काही वर्ष सुद्धा जातात.
प्रत्येक आवाजाचा त्रास आधी किरकोळच वाटतो आणि असतो ही. वेळेत लक्ष दिल्यास तो लगेच बरा होऊ शकतो, पण दुर्दैवानी आवाज बिघडत असताना लक्षात येत नाही. आला तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण लक्ष गायकीकडे असतं आणि लक्षात आलं तरी काय करायचं ह्याचा अभ्यास नसतो. 
आवाजातील बिघाड हा बहुधा आवाज चुकीचा वापरण्यातुन निर्माण होत असतो. क्वचित शारीरिक अस्वास्थ्यामुळेही आवाज बिघडु शकतात.

प्रत्येक बिघडलेला आवाज शारीरिक स्तरावर लगेच दिसतोच असे नाही. तो एकदा बिघडला की हा शारीरिक बिघाड आहे असं समजुन डॉक्टर, ENT specialists, Voice Therapists वगेरेंकडे धाव घेतली जाते. वैद्यकिय शास्त्रातला तज्ञ हा संगीताचा अभ्यासक नसतो आणि संगीतातला तज्ञ हा आवाजातला तज्ञ असतोच असं नाही. ह्या कारणामुळे आवाजाला नक्की काय होतए हे कुणीच नीट समजू शकत नाही आणि योग्य तो उपाय सापडत नाही. तिन्ही विषयांचा अभ्यास असणारे तज्ञही सापडत नाहीत.
अशी एखादी आवाजाची समस्या उत्पन्न झाल्यास कुणी काही काळ गाणं बंद ठेवतं, कुणी आपआपल्या परीने उपाय शोधत राहतं, कुणाची कालांतरानी ह्यातुन सुटका होते, कुणी आयुष्यभर आवाजाची ती समस्या किंवा मर्यादा सांभाळुन गाणं चालु ठेवतं, आणि कुणाचं गाणं कायमचं बंद होऊन संगीतिक कारकिर्द संपुष्टात येते. 
आवाजातले निश्चित उपाय त्याच्या निर्मितितिल दोष सुधारुन काढून टाकल्या शिवाय सफल होत नाहीत. आवाज निर्मिती नैसर्गिक झाली की आवाज मुळ पदावर येण्यास मदत होते पण नैसर्गिक आवाज कसा असावा ह्याचा अभ्यास नसतो. 

चांगला आवाज कसा असावा, चांगल्या आवाजाची लक्षणं, आवाज चांगला होण्यासाठी काय करावं वगेरे बद्दल अनेकांनी अभ्यास केलेला आहे पण आवाज बिघडु नये म्हणुन काय करावं किंवा आवाज बिघडतो आहे हे वेळीच कसे ओळखावे याबद्दल सर्वत्र अज्ञान दिसतं. त्याचा अभ्यास आवश्यक आहे. सर्व गायकांना ह्याबद्दल माहिती असायला हवी आणि पुढच्या पिढीला आवाजाबद्दल जागरुकता निर्माण करुन त्यांना तसे शिकवायला हवे. 

उस्ताद अल्लादिया खान साहेबांचा आवाज एकदा अति वापरामुळे बिघडला. आवाज आज सुधारेल उद्या सुधारेल या आशेत तो सलग दोन वर्ष जागेवर आला नाही. ‘ देवा! माझा आवाज मला परत दे, नाहीतर मरण दे’ , अशी दर नमाजाच्या वेळी ते हृदय फोडुन प्रार्थना करत. शेवटी दोन वर्षांनी आवाज किंचित काम देऊ लागला. 
‘त्या दोन वर्षात मनाच्या कसल्या अवस्थेत मी काळ कंठला, त्याचे वर्णन करता येत नाही. जीवंत असून जगात नाही अशी स्थिति झाली होती’ असे खाँ साहेब म्हणत. पण त्यांनी धीर सोडला नाही. बिघडलेल्या गळ्याला एक स्वतंत्र वळण द्यायच्या उद्योगाला ते लागले आणि बिघाडातून त्यांनी अजब बनाव निर्माण केला.

आपला ही आवाज उत्तम असावा, तो जास्त काळ टिकावा आणि तो बिघडत असल्यास वेळीच लक्षात यावं ह्यासाठी आवाजाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे त्यासाठी तो पूर्ण बिघडण्याची वाट पाहु नये..!


आवाज.. गाणाऱ्यांचं माध्यम’ या विषयावर अधिक माहितीसाठी आणि या विषयावरचे सगळे लेख वाचण्यासाठी follow करा sailypanse.blogspot.in

Thursday, 14 February 2019

NUDITYISART


                           An Artist is one who sees Divinity in Nudity.

Wednesday, 13 February 2019

Curves

                             
                                                Curves are beautiful!!



Monday, 11 February 2019

कुणी मित्र देता का मित्र ?


लग्न ठरलं की प्रत्येक जण आपापल्या परिनी नव्या जोडप्याला सल्ले देत असतो. मिळणाऱ्या सल्ल्यांमधला, एक सल्ला मला नेहमी आठवतो. ‘लग्नाला दहा बारा वर्ष झाली की दोघांमधे बोलण्यासारखं काsही उरत नसतं. काय गप्पा मारायच्या आहेत त्या पहिल्या दहा वर्षात मारून घ्या.’ प्रत्येकाला वाटतं, ”आमचं नाही बाबा होणार तसं ! आमची क्षेत्र वेगळी, अनुभव वेगळे, आम्हाला एकत्र मिळणारा वेळ ही कमीच, मग बोलायला काही नसेल असं कसं ?”

पहिली दहा वर्ष छान जातात, ती जाणार असतातच. एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना सगळं सांगणं, भरपूर गप्पा, sharing सल्ले मसलत.... आणि ..आणि मग अचानक सुरु होतात फक्त मित्रांच्या / मैत्रिणींच्या trips आणि ठरतात individual plans. मग जमतो वेगळा trekking चा ग्रूप, morningwalk चा group, Gym चा ग्रूप, शाळेतला ग्रूप, कॉलेज चा group आणि असे अनेक ग्रूप जिथे खूप जणं असतात फक्त नवरा आणि बायको सोडून ! आणि लक्षात येतं, इथेच खूप मज्जा येतीए. दोघांमधलं प्रेम तसुभरही कमी झालेलं नसतं पण आता जरा स्पेस हवी असते. नवीन कुणी तरी हवं असतं चौकशी करणारं, विचारपूस करणारं, दोन घटका गप्पा मारणारं, सल्ले देणारं. 

ऑफिस मधल्या कामाच्या व्यापामधुनसुद्धा दिवसातून सहज म्हणून केलेला एखादा फोन कधी थांबतो कळतंच नाही. आता सहज फोन आला तर वाटतं ठीके न सगळं, किंवा मग, आज काहीच काम दिसत नाही म्हणून आठवण झालेली दिसतीए !

Birthdays, Anniversarys चे surprise गिफ्ट कधीच थांबलेले असतात. खूप आहे काय देणार म्हणून, किंवा ‘online पाहिजे ते सारखंच तर आणत असतेस अजून काय वेगळं आणायचं मी ?’, ‘तु सांग, हवं ते घ्यायला जाऊ ! ‘ पण ह्यात, गिफ्ट मिळायची मजा नाहीच मुळी.! अशा दिवशी कुठे दोघंच बाहेर जेवायला जावं म्हणलं, तरी काय बोलायचं बरं एकमेकांशी ? नवीन जोडपी कशी अखंड गुलू गुलू करत असतात, तसं कसं बरं जमावं आता ? हां, त्याजागी एखादा मित्र असेल तर मात्र जमेल. कसं कुणास ठाऊक बुआ !!

जरा विचार केला आणि वाटलं असं होणं स्वाभाविकच आहे की, अति परिचय आणि अति सहवासातून दुसरं काय होणार ?  माणसाला ना सतत नाविन्याचा ध्यास असतो. आपल्याला फक्तं त्याच गोष्टीबद्दल कुतूहल आणि आकर्षण वाटत असतं, ज्या बद्दल माहीत नसतं आणि नवरा तर दहा वर्षांमधे कोळून प्यायलेला असतो. मग अशा वेळी मित्रंच तर कामी येणार ना ? गप्पा मारायची जागा एखाद्या मित्रानी घेतली तर काय बिघडलं ? उगाच कंटाळून, मारून मुटकुन, आणि पर्याय नाही म्हणून एकमेकांना सगळं सांगायला हवं असं कुणी सांगितलं ? मन मोकळं होणं महत्वाचं, मग ते नवऱ्याकडे असेल किंवा मित्राकडे, नवरा बायको मधे प्रेम टिकुन राहिलं म्हणजे बास !


त्या मैत्रीमधे आणि मैत्री पलिकडच्या नात्यामधे एक बारीकशी रेश असते, त्याचं भान असलं म्हणजे झालं !! ते भान ठेवुन मैत्री जमली तर खुशाल करावी मैत्री आणि खुशाल करावं मन मोकळं, उगाच नवऱ्यावर तरी कीती जवाबदाऱ्या टाकाव्या ?